जापान जीन परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन; नवीन रोहित्र बसविण्याची मागणी.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर  : अमळनेर शहरातील जापान जीन परिसरातील वीज वितरण रोहित्र (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) वारंवार बिघडत असल्याने परिसरातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असून दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.


या समस्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अमळनेर शहर अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सैय्यद अझहर अली यांनी शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित रोहित्राची अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली असली तरी त्यामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने केवळ दुरुस्ती करून ही समस्या कायमस्वरूपी सुटणार नाही. परिसरातील वाढती लोकसंख्या व वाढलेला वीजवापर लक्षात घेता सद्यस्थितीतील रोहित्र बदलून त्या ठिकाणी अधिक क्षमतेचा नवीन रोहित्र तातडीने बसविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांना अखंड, सुरक्षित आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच या मागणीकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सैय्यद अझहर अली यांनी निवेदनाद्वारे दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed