. जि. एस. हायस्कूलचे उपशिक्षक उमाकांत हिरे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या शहराध्यक्षपदी.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : येथील जी.एस. हायस्कूलचे उपशिक्षक उमाकांत अशोकराव हिरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी ही नियुक्ती जाहीर केली. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते उमाकांत हिरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


यावेळी शहराध्यक्ष चेतन राजपूत, निलेश महाजन, प्रकाश जैन, आर. जे. पाटील, शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल वाघ, साने गुरुजी पतपेढीचे संचालक रोहित तेले, राहुल पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीनंतर उमाकांत हिरे यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांच्या हितासाठी काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उमाकांत हिरे यांच्या या नियुक्तीचे शिक्षक, सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed