अमळनेरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे वितरण.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते
स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेरच्या वतीने विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि महाविद्यालयांना स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेच्या फोटो फ्रेम भेट देण्याचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने २२ जुलै हा दिवस स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये स्मरणदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यालयांमध्ये स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा उपलब्ध व्हावी आणि त्यांची जयंती सन्मानपूर्वक साजरी करता यावी, या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनीष पाटील, तालुकाध्यक्ष प्रणव चौधरी आणि कार्याध्यक्ष हुजैफा पठाण यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली. या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर, प्रदेश सचिव सुनील शिंपी, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, युवक काँग्रेस शहराध्यक्ष दुर्गेश पाटील, शहर कार्याध्यक्ष भूषण लोहार, उपाध्यक्ष चैतन्य संदानशिव, माजी शहराध्यक्ष कृष्णा पाटील, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, शहराध्यक्ष मनीष पाटील, तालुकाध्यक्ष प्रणव चौधरी, कार्याध्यक्ष हुजैफा पठाण, सोशल मीडिया शहराध्यक्ष रोहित सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
