प्रथम प्रयत्नातच NEET मध्ये खान अलीझाचे घवघवीत यश; 720 पैकी 595 गुण मिळवत वैद्यकीय शिक्षणाकडे दमदार वाटचाल.

0

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर शहरातील जपान जिन परिसरातील रहिवासी खान अलीझा रिजवानुर रहमान पठाण हिने राष्ट्रीय स्तरावरील NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षेत प्रथम प्रयत्नातच उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कुटुंबासह शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने 720 पैकी 595 गुण मिळवून वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.

खान अलीझाने बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री या तिन्ही विषयांमध्ये 99 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हे यश मिळविले असून तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यापूर्वीही तिने मुंदडा ज्युनिअर कॉलेजमधून बारावीची परीक्षा 90 टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण होत आपली शैक्षणिक चमक दाखवली होती. त्यानंतर NEET परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करून तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले.
खान अलीझा ही अल-फैज उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका खान अनीसा परवीन यांच्या भावाची कन्या आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षकवृंद, समाजातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed