तापीमातेच्या जन्मोत्सवानिमित्त पाडळसरे धरणावर भाविकांची श्रद्धांजली; जयश्री पाटील यांच्याकडून साडी-चोळी अर्पण.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : तापी नदी माता जन्मोत्सवानिमित्त पाडळसरे धरण परिसरात भक्तिमय वातावरणात पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांनी तापीमातेला साडी-चोळी अर्पण करून विधीवत पूजा केली.


पूजनानंतर त्यांनी तापीमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करत अमळनेर मतदारसंघ जलसमृद्ध, सुजलाम-सुफलाम राहावा, शेतकऱ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदावी तसेच अमळनेर शहराला वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा मिळत राहावा, अशी प्रार्थना केली. तापीमातेच्या कृपेने परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी आणि जलसंपत्तीचा प्रवाह अखंडित राहावा, अशीही त्यांनी मंगलकामना व्यक्त केली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण व शहरातील पदाधिकारी, अमळनेर नगरपालिकेचे नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनीही तापीमातेला फुले अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed