एवजाज बागवान यांचा समाज रत्न पुरस्काराने गौरव.

0

 


नंदुरबार(प्रतिनिधी)-येथील सामाजिक कार्यकर्ते एजाज बागवान यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्यावतीने समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या २७ वा वर्धापन दिन नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणार्‍या १११ जणांनाभारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर छत्रपती संभाजी नगर येथे समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. मराठवाडा विभागाचे परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्या हस्ते एजाज बागवान यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख, मनपाचे कार्यकारी अभियंता श्रीमती मोहिनी, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबेर, खुलताबदचे नगराध्यक्ष आमीर पटेल, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाडा अध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed