राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमळनेरच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रणव चौधरी तालुकाध्यक्ष, मनीष पाटील शहराध्यक्ष तर हूजैफा पठाण कार्याध्यक्षपदी विराजमान.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेरच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रणव चौधरी यांची तालुकाध्यक्षपदी, मनीष पाटील यांची शहराध्यक्षपदी आणि हूजैफा पठाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करत पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी हितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रणव चौधरी, मनीष पाटील आणि हूजैफा पठाण हे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय तसेच विविध समस्यांसाठी सातत्याने लढा देत आहेत. विद्यार्थ्यांशी असलेला त्यांचा घनिष्ठ संपर्क, संघटन कौशल्य आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आगामी काळात विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी कार्य करतील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चैतन्य संदानशिव, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, सोशल मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, विद्यार्थी सहसचिव चेतन बोरसे तसेच योगेश पाटील, प्रीत शाह यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
