राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त अमळनेरात उत्साहात ध्वजारोहण.

0
Oplus_131072

Oplus_131072

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त अमळनेर येथील पक्ष कार्यालयात माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्या हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पक्ष कार्यालयासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. ध्वजारोहणानंतर भागवत पाटील यांनी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला उजाळा दिला. तसेच आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होत असल्याचे सांगितले.
यावेळी भविष्यात विविध संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी “राष्ट्रवादीचा जयघोष” करत उत्साह व्यक्त केला.
या प्रसंगी ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, रिता बाविस्कर, राजश्री पाटील, प्रा. मंदाकिनी भामरे, प्रा. सुरेश पाटील, चेतन राजपूत, सुनील काटे, विनोद कदम, संजय पुनाजी पाटील, विक्रांत पाटील, रणजित पाटील, भूषण भदाणे, पंकज साळी, शिवाजीराव पाटील, एल. टी. पाटील, जितेंद्र ठाकूर, मुक्तार खाटीक, नरेंद्र संदानशीव, भरत ललवाणी, सचिन पाटील, अलीम मुजावर, चंद्रकांत पाटील, भूषण पाटील, सनी गायकवाड, भारती शिंदे, योगेश पाटील, राहुल गोत्राळ, महारू पाटील, हिंमत पाटील, निलेश देशमुख यांच्यासह बाजार समिती, शेतकी संघाचे पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच ग्रामीण व शहरी भागातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed