शिवजयंती मिरवणुकीत नाचताना खुनी हल्ल्याचे आरोपी जेरबंद..

0
New-Doc-02-21-2026-09.27.jpg


आबिद शेख/अमळनेर
जळगाव येथे एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या दोन आरोपींना अमळनेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, अमळनेर शहरातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होऊन नाचताना आढळून आला.


चेतन किरण धोबी उर्फ सत्तू तसेच कार्तिक रवींद्र पारधी (रा. गांधलीपुरा) यांनी आपल्या मित्रासोबत मिळून राकेश जगन्नाथ पाटील (रा. बोरनार, ता. जळगाव) याच्यावर रात्री सुमारे साडेनऊ वाजता कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे आरोपी अमळनेर येथे आल्याची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ अमळनेरचे डीवायएसपी विनायक कोते व पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती दिली.
यानंतर हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे, सुनील तेली, अमोल करडईकर तसेच एमआयडीसीचे रामकृष्ण पाटील व रमेश चौधरी यांच्या पथकाला आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले.
१९ तारखेला रात्री पैलाड भागात शिवजयंती मिरवणुकीत दोन्ही आरोपी नाचताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना अटक केली.
दरम्यान, चेतन उर्फ सत्तू धोबी याला यापूर्वीच अमळनेर शहरातून हद्दपार करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईमुळे पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed