प्रजासत्ताक दिनानिमित्त एच.यू.एच. मुंडीया पब्लिक स्कूलमध्ये भव्य कार्यक्रम; आमदार मंगेश चव्हाण यांचे शाळेच्या कार्याला भरभरून कौतुक..
चाळीसगाव | प्रतिनिधी
आज दिनांक २६ जानेवारी २०२६, सोमवार रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नागद रोड, चाळीसगाव येथील एच.यू.एच. मुंडीया पब्लिक स्कूल येथे भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्तबद्ध सादरीकरण तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती पाहून आमदार मंगेश चव्हाण यांनी शाळेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संस्कार व राष्ट्रभक्ती जोपासावी, असे मार्गदर्शन करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चाळीसगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, नगरसेवक अमोलभाऊ चौधरी, बांधकाम सभापती फकीरा बेग मिर्झा, नगरसेवक वसीम, चेअरमन बाबा ठेकेदार, धर्माभाऊ, रामचंद्रभाऊ जाधव, प्रभाकरभाऊ चौधरी, अनिलभाऊ ठाकरे, नगरसेवक संभाप्पा जाधव, शिक्षण सभापती करण राजपूत, नगरसेवक इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच स्टेशनचे एपीआय शंकर मुटेकर साहेब, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय राजपूत साहेब, मिलिटरी मेजर सोनवणे साहेब, मिलिटरीचे सेवानिवृत्त कर्मचारी मेजर कमरुद्दीन साहेब, पोलीस हवालदार अकरम मुबारक बेग यांचीही उपस्थिती लाभली.
शाळेच्या वतीने प्राचार्य मुहम्मद सफवान, अकॅडमिक हेड नुमान बिन साबिथ, फॅकल्टी हेड मोहम्मद असजल तसेच शिक्षकवर्गातील स्नेहल देशमुख, भावना लांबोळे, गायत्री योगेश, दीपाली नागणे, रक्षिता राणे, नुज़हत शेख, सना हाफिज खान आदी उपस्थित होते.
शाळा समितीचे सेक्रेटरी हाजी शकील भाई मंसुरी, उपाध्यक्ष गुलाम दस्तगीर खान सर, अशपाक भाई टेलर, विद्यार्थ्यांचे पालक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
