अमळनेरमध्ये बासरी वादन कार्यशाळा : पंडित विवेक सोनार यांचे मार्गदर्शन..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने शनिवार, दि. 20 डिसेंबर 2025 रोजी एक दिवशीय बासरी वादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे मार्गदर्शन पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य – पंडित विवेक सोनार (मुंबई) करणार आहेत.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे समाज प्रबोधनासोबतच कला, संगीत, नाट्य आणि विविध कलागुणांची जोपासना व अभिरुची विकसित करण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविले जातात. खान्देशात गुणी कलाकार घडावेत, रसिक वर्ग वाढावा आणि सांस्कृतिक जाण जपली जावी या उद्देशाने प्रतिष्ठान विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
संगीत, गाणे आणि बासरीच्या सुरावटी माणसाला आनंद देतात. हा आनंद अधिकाधिक लोकांनी अनुभवावा व बासरी वादनाचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेत बासरी वादनाचा रियाज, रागदारी, ताल सराव तसेच बासरीतील विशेष तंत्रांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ठिकाण : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रस्ता, अमळनेर
दिनांक : शनिवार, 20 डिसेंबर 2025
नोंदणी : 9421702841
कार्यशाळा : नि:शुल्क
या उपक्रमाचा लाभ कलाप्रेमींनी व बासरीप्रेमींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद सराफ, कार्यवाह दर्शना पवार तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी केले आहे.
