इक़बाल  कुरेशी यांची समाजवादी पक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती..

0
New-Doc-11-11-2025-07.05.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :- अमळनेर येथील समाजवादी पक्षाचे कटर समर्थक इकबाल कुरेशी यांची समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांनी दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी इक़बाल अब्दुल आहद कुरेशी यांची समाजवादी पक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

पक्षाच्या विचारसरणी व धोरणांनुसार संघटना मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करत ही जबाबदारी कुरेशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 30 जून 2027 पर्यंत राहणार आहे.

अबू आसिम आजमी यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, कुरेशी पक्षाच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेवर ठाम राहून समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करतील व संघटनेच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed