अमळनेर पोलिसांचा धडक कारनामा! मोटारसायकल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद — तब्बल 24 चोरीच्या दुचाकींचा मुद्देमाल जप्त..

0
New-Doc-11-10-2025-22.01.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :अमळनेर शहर व परिसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवत अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल २४ चोरीच्या मोटारसायकलींसह दोन आरोपींना अटक करून एकूण ₹१५ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अभित नेरकर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

गुन्हे शोध पथकातील पोउपनि शरद काकळीन, पोहेकॉ प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार महसके, नितीन मनोरे, उज्वल पाटील आणि हितेश बेहरे यांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे मोठ्या शिताफिने आरोपींचा शोध लावला. अटक करण्यात आलेले आरोपी —
हिमंत हिज्या पावरा
अंबालाल भुरट्या खरडे
(दोघेही रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार)

दोघांना धडगाव तालुक्यातील डोंगर आणि जंगल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी अमळनेर तसेच इतर ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी शहादा तालुक्यातील जंगल परिसरात जाऊन त्यांच्या सांगण्यावरून चोरीच्या २४ मोटारसायकली जप्त केल्या, ज्यामध्ये होंडा यूनिकॉर्न, होंडा शाईन, बजाज पल्सर, हिरो स्प्लेंडर आणि TVS रायडर अशा विविध कंपन्यांच्या मोटारसायकलींचा समावेश आहे.

जप्त मुद्देमालाची एकूण किंमत — ₹१५,६३,०००/-

या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ काशिनाथ पाटील आणि पोहेकॉ सागर साळुंखे हे करीत आहेत.

अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या या यशस्वी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed