फरार गुन्हेगार अमजद कुरेशी अखेर अटकेत!LCB जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमळनेर पोलिसांकडे सुपूर्द

0
New-Doc-10-29-2025-06.52.jpg

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर पोलिसांच्या ताब्यातून काही दिवसांपूर्वी बेडयांसह फरार झालेल्या दोन गुन्हेगारांपैकी एक अमजद फकिरा कुरेशी (रा. मेहरून, जळगाव) अखेर दिल्ली येथे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाच्या हाती लागला आहे. पोलिसांच्या अथक शोधमोहीमेच्या अखेरीस मिळालेल्या या यशामुळे अमळनेर पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांप्रकरणी ताब्यात असलेले दोन आरोपी बेडयांसह फरार झाले होते. या घटनेने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना अलर्ट जारी करण्यात आला. यानंतर LCB जळगावचे अधिकारी व पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सखोल तपास सुरू ठेवला.
गुप्त माहितीच्या आधारे तपास वाढविल्यानंतर कुरेशी दिल्ली परिसरात लपल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी विशेष पथक दिल्लीला रवाना केले. अत्यंत गुप्तपणे राबविलेल्या कारवाईत आरोपीला अटक करण्यात यश आले. अटक केलेल्या अमजद कुरेशीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, दुसरा फरार आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
“गुन्हेगार कितीही शातिर असला तरी सुटू शकत नाही”
या संपूर्ण कारवाईबाबत अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम म्हणाले,

“गुन्हेगार कितीही शातिर असला तरी पोलिसांच्या हातातून फार काळ सुटू शकत नाही. पोलिस यंत्रणा सतत सतर्क आहे आणि सर्व फरारी आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेसमोर उभे केले जाईल.”
या यशस्वी कारवाईसाठी LCB जळगावचे अधिकारी व संपूर्ण पथकाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. गुन्हेगारांच्या गळचेपीसाठी पोलिसांची ही कारवाई प्रेरणादायी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed