जन्माष्टमीनिमित्त रवि ज्वेलर्सचा ‘कृष्ण साज’ उपक्रम; ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पावन सण भक्तिमय वातावरणात साजरा होत असताना अमळनेर येथील रवि ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जन्माष्टमीच्या निमित्ताने रवि ज्वेलर्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची आठवण करून देणारा आकर्षक ‘कृष्ण साज’ भेट म्हणून देण्यात आला.

या उपक्रमाला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दागिन्यांच्या खरेदीसोबतच विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून ग्राहकांशी भावनिक नाते निर्माण करण्याचा रवि ज्वेलर्सचा प्रयत्न विशेष ठरला.

रवि ज्वेलर्सकडून दरवर्षी विविध सणांच्या निमित्ताने ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. “तुमच्या प्रत्येक क्षणासाठी, आमचा खास दागिना” या भावनेनुसार ग्राहकांच्या आनंदात सहभागी होण्याचा हा उपक्रम असल्याचे रवि ज्वेलर्सच्या वतीने सांगण्यात आले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, रवि ज्वेलर्सचा ‘कृष्ण साज’ उपक्रम अमळनेरकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

