अझर सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अमळनेर शहर अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अमळनेर शहर अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्षपदी अझर सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र माजी मंत्री तथा लोकनेते, भूमिपुत्र आणि लोकप्रिय आमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चेतन (भाऊ) राजपूत, शहर कार्याध्यक्ष गोविंद बाविस्कर, माजी शहर युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष इमरान खाटीक, शेतकी संघाचे माजी संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमळनेर तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अलीम मुजावर, आरिफ मेवाती, शहर चिटणीस जुनेद शेख, बाबा शेख, समीर शेख, असलम टेलर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीनंतर उपस्थित मान्यवरांनी अझर सय्यद यांचे अभिनंदन करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अझर सय्यद यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
