लोकसहभागातून रस्ता दुरुस्तीचा उपक्रम; ११ जून रोजी नागरिकांना श्रमदानाचे आवाहन.

0
New Doc 06-08-2026 19.53

अमळनेर  : “खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या साने गुरुजींच्या विचारांचा वारसा जपत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या पुढाकाराने रस्ता दुरुस्ती व सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, ११ जून रोजी सकाळी ६ वाजता या उपक्रमाची सुरुवात होणार असून, प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या हस्ते श्रमदान मोहिमेला प्रारंभ केला जाणार आहे.


शेतकरी, कष्टकरी, मजूर बांधव, पर्यावरणप्रेमी तसेच अमळनेरातील सर्व संवेदनशील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्ता दुरुस्तीचे काम लोकसहभागातून करण्याचा निर्धार प्रतिष्ठानने व्यक्त केला असून, नागरिकांनी किमान एक तास श्रमदान करून योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


या उपक्रमामागे केवळ रस्ता दुरुस्तीचा उद्देश नसून मुलांमध्ये आणि समाजामध्ये कृतज्ञता, प्रेम, परोपकार, संवेदनशीलता व सामाजिक मूल्ये रुजविण्याचा व्यापक हेतू आहे. “जुनं ते सोनं” असे म्हणताना खरे सोनं म्हणजे मूल्यसंस्कार असल्याचे प्रतिष्ठानने नमूद केले आहे.
निसर्ग संवर्धन, सामाजिक जबाबदारी आणि मानवतेची जपणूक या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमात नागरिकांनी आपल्या कुटुंबासह व मुलांसह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी ९०७५५७०५१० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed