गटारीत वॉटर सप्लायचा व्हॉल; मुख्य बाजारपेठेत धक्कादायक वास्तव उघड…

0
New-Doc-04-28-2026-14.20.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील मुख्य बाजारपेठेतील गंगाघाट परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेला गंभीर प्रकार समोर आला आहे. धर्मा प्रोव्हीजन समोर व ताज टी हाऊसजवळ अक्षरशः तुंबलेल्या गटारीच्या पाण्यात वॉटर सप्लायचा व्हॉल (पाणीपुरवठा झडप) असल्याचे विदारक चित्र एका सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.


या प्रकारामुळे स्वच्छ पाणीपुरवठ्याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गटारीच्या साचलेल्या घाण पाण्यात असलेला हा व्हॉल नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत पाण्यात जंतू व घातक जीवाणू मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन हा व्हॉल सुरक्षित ठिकाणी हलवावा किंवा परिसराची स्वच्छता करून योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, शहरात आधीच पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी असताना अशा प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणावर नगरपरिषद काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed