शास्त्री फार्मसीच्या बी. फ़ार्मच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
एरंडोल ( कुंदन ठाकुर)पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या बी. फार्मसी चा निकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेकनॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांनी जाहीर केला. द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले. द्वितीय वर्षाचा सोनावणे नकुल रविन्द्र (8.44) पहिला, ठोसर संकेत गजानन (8.39) दुसरा तर ठाकरे रोशन विद्याधर (8.36) तिसरा आला. तसेच तृतीय वर्षाचा निखिल सुरेश पाटील (8.76) पहिला, वैष्णवी प्रविण सोनार (8.69) दुसरी तर योगिनी नितीन राणे (8.63) तिसरी आली.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशा बद्दल संस्थेचे सचिव सौ. रूपा शास्त्री, प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले असे श्री. शेखर बुंदेले यांनी कळवले.
