ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फेछत्रपती शिवरायांच्या स्मृतींना उजाळा..

0
New-Doc-02-20-2026-09.25.jpg

नंदुरबार/प्रतिनिधी
नंदुरबार-येथील ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी

महाराजांच्या अश्‍वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
माजी नगराध्यक्ष रवींद्र परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान हे होते. यावेळी एजाज बागवान म्हणाले की, हिंदु-मुस्लिम हे एकतेचे प्रतिक म्हणून ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका धर्माचे नसून त्यांनी सर्वधर्मियांसाठी एकतेची हाक दिली होती. अठरा पगड जाती आणि बालाबलुतेदारांसाठी त्यांनी काम केले आहे.
कार्यक्रमास सदा जनसेवा फाऊंडेशचे राज्य उपाध्यक्ष ऍड.मजहर शेख, निशाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप सोनवणे, माजी नगरसेवक मोहन श्रॉफ, पत्रकार राजेंद्र बुवा, ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा उपाध्यक्ष सईद कुरेशी, शहर उपाध्यक्ष अजिम बागवान, कॉंग्रेस रोजगार स्वयंरोजगार राज्य सरचिटणीस दत्तू पवार, राष्ट्रीय भीम सेना जिल्हाध्यक्ष शंकर जाधव, माजी नगरसेवक अतुल पाटील, काशिनाथ वळवी, समीर शेख, दानिश बागवान आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सईद कुरेशी तर आभार रिजवान बागवान यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed