चाळीसगाव तालुक्यातील ४०० विद्यार्थ्यांना १४ लाख रूपयांच्या शिष्यवृत्तीचा मिळणार लाभ ; आ. मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व !
शिवजयंती व रामराव पाटील यांच्या पुण्यतिथी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत दिली जाणार शिष्यवृत्ती !
चाळीसगाव (प्रतिनिधी) परिस्थिती शिक्षणाचा डोंगर सर करतांना अडसर ठरतेचं. गुणवत्ता असूनही आर्थिक कारणांमुळे शिक्षणाचं पाऊल थांबतं. यामुळेच चाळीसगाव तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भरारीला बळ देण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण पुढे सरसावले असून यंदापासून शिवजयंती व चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते ‘सहकार व शिक्षण महर्षी स्व. रामराव जिभाऊ पाटील यांच्या नावाने विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना त्यांनी सुरु केलीय. जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशीया, जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ही शिष्यवृत्ती उद्या (१९ फेब्रुवारी) दिली जाणार आहे
