24 प्राईम न्यूज 2026

ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील गरुडझेप पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्काराचे शानदार आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असते.
यामध्ये रणरागिणी पुरस्कार,गरुडझेप पुरस्कार, आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श माता-पिता आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत. वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, महिला ,सहकार, आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थाना दि.२५ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुरस्कार माहिती पीडीएफ स्वरुपात पाठवायची आहे .पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी सहा ते सात ) फोन करु शकता. अधिक माहितीसाठी फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी विलासराव कोळेकर, श्री सागर पाटील (रत्नागिरी),श्री शेखर सुर्यवंशी (सांगली),श्री बाबासाहेब राशिनकर ( गुहागर), अरविंद सिध्दरेड्डी (सांगली),सुनंदा नाईक (कोल्हापूर) कल्याणी मॅडम (ठाणे), डॉ.शंकर अंदानी, बाळ तोरसकर ( मुंबई ), प्रतापराव शिंदे (कोकरुड), शिरीष कुलकर्णी (पुणे ), प्रशांत लाड (रायगड), सचीन बैरागी, डॉ. सुनिल भावसार (नाशिक), प्रा. डॉ. महेश मोटे (धाराशिव), बापुसाहेब कांबळे(नेर्ले ), अण्णासाहेब कोळी (सातारा), श्री. राजेश जोष्टे (चिपळूण), बापुसाहेब हुंबरे (बीड), अनिल उपाध्ये, प्रा.सर्जेराव राऊत (कोल्हापूर), कुमार गायकवाड (पलुस),सौ. संगिता शिंदे (सातारा), राजेंद्र गोसावी व प्रा. डॉ. प्रकाश माळी(ठाणे), अशोकराव शिंदे, प्रकाश वंजोळे, श्री. दिपक पोतदार (जयसिंगपूर) सुनिल पवार (रत्नागिरी), दिलीप शेडगे (मुंबई), विजय जगताप व भास्कर सदावर्ते (पुणे), प्रा. डॉ. बापुसाहेब कांबळे (मुंबई), प्रा. रावसाहेब राशिनकर, संजय नवले, हरिभाऊ मंडलिक (अहिल्यानगर), श्री. दिनेश कांबळे (पलूस) श्री. संजय गायकवाड (रायगड ), श्रीकांत बाविस्कर,मनोज राऊत, विरभद्र पोतदार (सोलापूर), ॲड. अनिशा फणसळकर (पुणे), प्रशांत चव्हाण (गुहागर), पंढरीनाथ बोकारे, अय्युब पठाण (नांदेड) यांनी पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले आहे.

