Main Story

Editor's Picks

Blog

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : अभियंता दिनाचे औचित्य साधत रवि ज्वेलर्सच्या वतीने अमळनेर शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. अभियंत्यांच्या तांत्रिक ज्ञान, कौशल्य आणि समाजाच्या विकासातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


शहराचे नियोजन, बांधकाम, औद्योगिक प्रकल्प, तंत्रज्ञान तसेच विविध पायाभूत सुविधा उभारण्यात अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विकासाला गती देण्याचे काम अभियंते करीत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला अमळनेरचे उपनगराध्यक्ष इंजी. प्रशांत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इंजी. अक्षय सोनवणे, इंजी. नितीन वाडेकर, इंजी. प्रशांत बडगुजर, इंजी. सागर पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील अभियंते उपस्थित होते.


रवि ज्वेलर्सतर्फे उपस्थित अभियंत्यांना सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक योगदानाप्रती आदर व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे रवि ज्वेलर्सच्या वतीने सांगण्यात आले.
या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व अभियंत्यांनी कौतुक केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

You may have missed