Main Story

Editor's Picks

Blog

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : शहरातील सानेनगर भागात गुरुवारी दुपारी झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकारात योगेश मनोज पाटील हा तरुण जखमी झाला असून, घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


योगेश पाटील याला झुडपांमध्ये बिबट्या दिसताच त्याने आरडाओरड करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तो जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.


घटनेनंतर कार्यकर्त्यांनी बोरी नदीकाठचा परिसर पिंजून काढला. बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागानेही तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले असून, दोन ट्रॅप कॅमेरेही कार्यान्वित करण्यात आले आहेत.
बिबट्याला पिंजऱ्यात आकर्षित करण्यासाठी त्यामध्ये जिवंत बकरीचे पिल्लू ठेवण्यात आले आहे. पिल्लाच्या आवाजामुळे बिबट्या त्या दिशेने येईल आणि पिंजऱ्यात अडकेल, अशी व्यवस्था वनविभागाने केली आहे.

You may have missed