Main Story

Editor's Picks

Blog

अमळनेर/ आबिद शेख 


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत खा. शि. मंडळाच्या P.B.A. English Medium Schoolच्या विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी करत Under-17 मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा अनुभूती स्कूल, जळगाव येथे उत्साहात पार पडली.


या विजयी संघात कॅप्टन विनिता धनराज कोळी, अक्षरा जयेश पाटील, हर्षिता जितेंद्र वाधवाणी, हिताक्षी अरुण पाटील आणि ग्रंथी किशोर पाटील यांचा समावेश आहे. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी संघ सज्ज झाला आहे.


विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. श्री. संदेश गुजराथी व मुख्याध्यापक श्री. जे. एस. देवरे यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Oplus_131072

या यशासाठी क्रीडा शिक्षक श्री. महेश माळी, श्री. विनायक सूर्यवंशी, श्री. प्रशांत वंजारी तसेच चि. रोहन मुंदडा यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शाळा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You may have missed