Main Story

Editor's Picks

Blog

अमळनेर /आबीद शेख

अमळनेर  नगरपरिषदेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियान व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “स्वच्छता ही सेवा अभियान 2026” राबविले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून अमळनेर नगरपरिषद व लायन्स क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.

सहभागींनी हातमोजे, मास्क व झाडू घेऊन बस स्थानकाचा परिसर, प्रवासी थांबे व बसेस उभ्या राहण्याच्या जागेची साफसफाई केली. परिसरातील कचरा, प्लास्टिक व पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना **स्वच्छतेची शपथ** तसेच **नशा मुक्त भारत शपथ** देण्यात आली. “चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान” हा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. बस स्थानक हे हजारो प्रवाशांच्या वर्दळीचे ठिकाण असल्याने येथे स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे आवाहन करण्यात आले. प्रवासी, व्यावसायिक व नागरिकांनी कचरा इतस्ततः न टाकता कचराकुंडीचा वापर करावा, असेही सांगण्यात आले.

**सदर प्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी व अमळनेर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, प्रभाग मुकादम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.**

स्वच्छता ही सेवा अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविले जात असून, त्यात “एक दिवस, एक तास, एक साथ” या संकल्पनेतून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

Oplus_131072

You may have missed