Main Story

Editor's Picks

Blog

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : मंगळ मंदिराच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला डंपरचालकाने चकवा देत वाहन पळवून नेल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मंडळ अधिकारी नरेंद्रकुमार धनराळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांच्या आदेशानुसार ते ग्राममहसूल अधिकारी आदिती जरे यांच्यासह पथक घेऊन मंगळ मंदिराच्या मागील भागात अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुरूम वाहतूक करणारा डंपर क्रमांक एमएच १४ सीपी ७२७५ समोरून येताना दिसला.

महसूल पथकाने डंपर थांबविण्याचा इशारा केला; मात्र चालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून वाहन वेगाने पुढे नेले.
महसूल पथकाने डंपरचा पाठलाग केला. अमळनेर बसस्थानकाच्या अलीकडे चालकाने डंपर डाव्या बाजूला टाकला. त्यानंतर इस्लामपुरा परिसरातील दुर्गा हॉस्पिटलजवळ पुन्हा डंपर अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले.
महसूल कर्मचाऱ्यांनी चालकाला थांबण्यास सांगून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून डंपर पळवून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित डंपरचालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोहेकॉ मिलिंद सोनार करीत आहेत.

You may have missed